
अशोक जोशी, निवृत्त बँक अधिकारी
ashokjoshi9@yahoo.com
आपण आपल्या मालकीचे घर भाड्याने देताना भाडेकरूची माहिती घेतो. पोलिसांना, सोसायटीला त्याबाबत माहिती देतो, त्याचप्रमाणे आपल्या बँकेतील बचत खात्याचीदेखील जागरुकतेने काळजी घेणे आजच्या सायबर फसवणुकीच्या काळात अत्यावश्यक आहे. तुमचा संबंध नसलेले आर्थिक व्यवहार तुमच्या बँकेतील खात्यात झालेले आढळले, तर तुम्ही तुमचे खाते भाड्याने दिले आहे, असे गृहीत धरले जाईल आणि कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे बँकखात्यातील व्यवहारांबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे.