Cyber Security Sakal
Sakal Money
मोबाईल फोनची भेट पाठवून फसवणूक
सायबर चोरटे नवनवीन कल्पना वापरून फसवणूक करत आहेत. बँकेच्या नावाखाली गिफ्ट आणि पॉइंट्स मिळत असल्याचे सांगून ग्राहकांची फसवणूक केली जाते. अशा स्कॅमपासून सुरक्षित कसे राहावे, जाणून घ्या!
शिरीष देशपांडे - सीए व सायबर गुन्हेविषयक अभ्यासक
सायबर चोरटे नवनवीन कल्पना शोधून त्याद्वारे फसवणूक करताना दिसत आहेत. माहिती असलेल्या सायबर गुन्ह्यातून वाचताना सर्वसामान्य नागरिक मात्र नव्या आकर्षक गिफ्टच्या नावाखाली फसत आहेत. नुकत्याच बंगळुरूमधील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला अनोळखी फोन आला, कॉल करणाऱ्याने त्या व्यक्तीचे बँक अकाउंट असलेल्या बँकेतून बोलतोय, असे सांगितले. तुम्ही बँकेचे खातेदार असून, आपल्याला नवे कार्ड देण्यासाठी मान्यता मिळाली आहे आणि आपल्या कार्डचे आधीचे पॉइंट बरेच आहेत, हे सर्व पाहून आपल्याला बँक एक नवा कोरा फोन पाठवत आहे, त्याचा स्वीकार व्हावा, असे सांगितले. यामुळे खातेदार एकदम आनंदले. दोन दिवसांत फोन कुरिअरद्वारे आला आणि पाठवणाऱ्याचे नाव अर्थात ज्या बँकेत खाते होते त्यांचेच होते.

