
पुरूषोत्तम बेडेकर
psbedeker21@gmail.com
बदलत्या सामाजिक परिस्थितीमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे आणि त्यामुळे एकल पालकांचे प्रमाणही वाढते आहे. एकल महिला पालकांना मानसिक; तसेच आर्थिक आव्हानांना तोंड द्यावे लागते. अशा आव्हानांचा सामना करताना, नेमके काय केले पाहिजे, आपल्या एकल पालकत्वाचा प्रवास सोपा करण्यासाठी आर्थिक आघाडी भक्कम ठेवली पाहिजे. आपल्या सर्वांचे आयुष्य समृद्ध करण्यामध्ये आपली आई, आजी, बहीण, पत्नी, त्याचबरोबर इतर नातलगांपैकी आत्या, मावशी, काकू, मामी, शाळेतील शिक्षिका, कामाच्या ठिकाणी असलेल्या सहकारी, अशा अनेक महिलांचे मोठे योगदान असते. महिलांचा सहभाग देशाच्या सर्व क्षेत्राच्या प्रगतीमध्ये असावा आणि विकासाचे नेतृत्व महिलांनी करावे, असा येऊ घातलेला नवा मतप्रवाह निश्चितच स्वागतार्ह आहे.