
Portfolio Insights: How ICICI Prudential Large & Mid Cap Fund Delivers Returns
वसंत कुलकर्णी, ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार
vasant@vasantkulkarni.com
लार्ज अँड मिड कॅप हा फंड गट सर्वांत लोकप्रिय म्युच्युअल फंड गटांपैकी एक आहे. ‘ॲम्फी’च्या आकडेवारीनुसार, लार्ज अँड मिड कॅप फंड गट मालमत्ता क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असला, तरी छोट्या गुंतवणूकदारांच्या खरेदीत हा फंड गट तिसऱ्या स्थानी आहे. अशा या गटातील आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लार्ज अँड मिड कॅप फंडाबाबत...
लार्ज अँड मिड कॅप फंड गटात ‘लाइव्ह फोलिओं’च्या संख्येने ३१ मार्च २०२५ रोजी एक कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ‘ॲम्फी’च्या वर्ष २०२४-२५च्या वार्षिक अहवालानुसार, लार्ज कॅप फंडांबाबत कल बदलल्याचे दिसून आला. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ६१३ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतल्याच्या तुलनेत २३,४८७ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.