

IDBI Bank Disinvestment and LIC Stake Sale Explained Key Details on Ownership Changes and the Potential Impact on Investors
sakal
नीलेश साठे, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ
जानेवारी २०१९ मध्ये जेव्हा भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने आयडीबीआय बँकेतील आपला हिस्सा ५१ टक्क्यांपर्यंत वाढवला तेव्हा सरकारच्या दबावामुळे ‘एलआयसी’ने आर्थिकदृष्ट्या दुबळ्या (नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स तब्बल २० टक्क्यांहून अधिक) असलेल्या बँकेत गुंतवणूक करून विमेदारांचे नुकसान केले अशी सार्वत्रिक चर्चा झाली होती. ‘एलआयसी’ने मात्र, आपण ही बँक चालवायला घेतली नसून, ही धोरणात्मक (स्ट्रॅटेजिक) गुंतवणूक आहे, योग्य वेळी आम्ही आमचा हिस्सा विकणार आहोत, हे वारंवार जाहीर केले, तरीदेखील बराच काळ या व्यवहाराकडे संशयाने पाहिले जात होते आणि ‘एलआयसी’ला अनेकदा आपली भूमिका ठामपणे स्पष्ट करावी लागली होती.