.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
प्राप्तिकर कायद्यातील फॉर्म १६ विषयी लिहायचे म्हटल्यावर मला प्रसिद्ध ‘साउंड ऑफ म्युझिक’ या चित्रपटातील ‘आय एम सिक्सटीन... गोइंग ऑन सेव्हन्टीन’ या लोकप्रिय गाण्याची आठवण आली. त्या गाण्यात सोळाव्या वर्षातून सतराव्या वर्षात पदार्पण करत असणाऱ्या नवयौवनेच्या भावभावनांचे मोठे बहारदार वर्णन आहे. तिच्या आयुष्यात वय वर्षे सोळा असण्याचे जे अनन्यसाधारण महत्त्व आहे, पगारदारांसाठी तेच महत्त्व प्राप्तिकरामधील फॉर्म १६चे आहे.