

आशुतोष दाबके, Ashutosh@wealthgrowth.in
‘सेबी’ आणि ‘ॲम्फी’ यांच्या व्याख्येप्रमाणे, ज्यांना आपण ‘म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्यूटर’ म्हणतो ते आज श्रीकृष्णासारखी भूमिका निभावताना दिसतात आणि गुंतवणूकदार हे अर्जुनाप्रमाणे आपल्या आयुष्यातील सर्व मोठ्या आर्थिक लढाया म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर यांच्या साह्याने सहजपणे जिंकताना दिसतात.
जणूकाही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर हे आधुनिक जगातील गुंतवणूकदारांचे सारथी आहेत. ते गुंतवणूकदारांची आर्थिक उद्दिष्टे समजून घेतात. या आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी किती कालावधी आहे हे जाणून घेतात. त्यांच्या सर्व शंकांचे समाधान करतात.