
डॉ. दिलीप सातभाई - चार्टर्ड अकाउंटंट- सीए
आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या प्राप्तिकर विवरणपत्रात अल्प वा दीर्घकालीन भांडवली नफ्यावर विशेष दराने करपात्र उत्पन्नावर कलम ८७अ करसवलत नाकारल्यामुळे प्राप्तिकर विभागाकडून २४ फेब्रुवारी २०२५ पासून अनेक करदात्यांना प्राप्तिकर भरण्याच्या नोटिसा मिळत आहेत. त्यामुळे लहान करदात्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने २४ जानेवारी २०२५ रोजी दिलेल्या निकालानंतर हा प्रश्न सुटला आहे, असे वाटत होते. मात्र, या नोटिसांमुळे पुन्हा एकदा या प्रश्नाने डोके वर काढले आहे.