

Incorrect information or pending tax liabilities can delay the Income Tax Refund even after filing the ITR successfully.
Sakal
ॲड. सुकृत देव, कर सल्लागार
आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी (आकारणी वर्ष २०२६-२७) नव्या करप्रणालीनुसार प्राप्तिकर विवरणपत्र भरताना उत्पन्न १२ लाख रुपयांच्या (पगारदार व्यक्तींना १२ लाख ७५ हजार रुपये) खाली आहे; पण प्राप्तिकर (टीडीएस/टीसीएस) कापलेला असेल किंवा आगाऊ करभरणा आदीमुळे कररक्कम सरकार जमा असल्यास, अशा वेळेस परतावा (रिफंड) मिळविण्यासाठी प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करावे लागेल, तरच भरलेली किंवा कापलेली कराची रक्कम परत मिळू शकेल. हा परतावा जलद मिळण्यासाठी विवरणपत्र भरताना काळजी घेणे आवश्यक आहे.