
वसंत कुलकर्णी - ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात, १२ लाख रुपयांहून कमी उत्पन्न असलेल्या आणि नव्या करप्रणालीची निवड केलेल्या नोकरदारांना मोठी भेट दिली आहे; तसेच २० लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या आणि नव्या करप्रणालीची निवड केलेल्या चाकरमान्यांचेही बरेच पैसे वाचणार आहेत. जागतिक स्तरावर सर्वांत तरुण लोकसंख्या असणारा आपला देश आहे. मुख्यतः जेव्हा कमावत्या वयातील लोकसंख्या पेन्शनसदृश आर्थिक स्रोतांवर अवलंबून असलेल्यांच्या संख्येपेक्षा जास्त असते, तेव्हा त्या देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी ती फायद्याची असते. या अर्थसंकल्पात वापर, खर्च किंवा उपभोग (कन्झम्प्शन) पुनरुज्जीवित (विशेषतः ग्रामीण भागात) करण्याचा प्रयत्न केला आहे.