Income Tax Returns: A Stressful Task Made Easier

Income Tax Returns: A Stressful Task Made Easier

Sakal

इन्कम टॅक्स रिटर्न भरणे होणार सोपे

एप्रिल २०२६ पासून लागू होणाऱ्या नव्या कर कायद्यामुळे पगारदार करदात्यांसाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरणे सोपे, जलद आणि तंत्रज्ञान-सुलभ होणार आहे. ‘प्री-फिल्ड रिटर्न’मुळे त्रास कमी होईल, परंतु करदात्यांची जबाबदारी कायम राहील.
Published on

डॉ. दिलीप सातभाई (ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट- सीए )

करकायदा

इन्कम टॅक्स रिटर्न अर्थात प्राप्तिकर विवरणपत्र भरणे आजही अनेक करदात्यांसाठी तणाव, गोंधळ आणि वेळखाऊ प्रक्रिया अशीच ओळख आहे. मात्र, आता एक एप्रिल २०२६ पासून लागू होणाऱ्या नव्या प्राप्तिकर कायद्यामुळे ही परिस्थिती लक्षणीयरीत्या बदलण्याची शक्यता आहे. सरकारच्या मते, हा कायदा करदात्यांसाठी अधिक सोपा, स्पष्ट आणि तंत्रज्ञान-सुलभ करअनुपालन अनुभव देणारा ठरणार आहे. वर्ष २०२६-२७ या कर वर्षापासून विवरणपत्र दाखल करताना अनेक पगारदार करदात्यांना फॉर्म भरत बसण्याऐवजी फक्त पडताळणी करून सादर करा असा अनुभव येऊ शकतो. हा बदल केवळ प्रक्रियेपुरता मर्यादित नसून, उत्पन्नाची माहिती कशी संकलित केली जाते, ती कशी नोंदवली जाते आणि कशी तपासली जाते, यामध्ये मूलभूत सुधारणा करणारा आहे. चुका, विसंगती आणि अनावश्यक तपासण्या कमी करणे हाच याचा उद्देश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com