
संपादकीय
सध्या भारतातील राजकीय परिस्थिती अशी झाली आहे, की कुठलाही मुद्दा, घोषणा, घटना; एवढेच नव्हे, तर आकडेही वितंडवादाचा विषय ठरतात. ताजे उदाहरण द्यायचे झाले, तर अर्थव्यवस्थेच्या संदर्भातील जागतिक आकडेवारीचे देता येईल.
अर्थव्यवस्थेच्या आकारमानाचा विचार करता भारत आता जगात चौथ्या स्थानावर पोचला आहे. अमेरिका, चीन व जर्मनी यांच्याखालोखाल भारताचा क्रमांक लागतो, याचे कारण भारताची अर्थव्यवस्था ४.२ ट्रिलियन डॉलरची झाली आहे.
जपानला भारताने मागे टाकल्याने आणि जर्मनीची अर्थव्यवस्था ४.७ ट्रिलियन डॉलरची असल्याने लवकरच भारत तिसरे स्थानही मिळवू शकेल, अशी दाट शक्यता आहे. आता हे जे घडले त्यात जपानमधील सध्याचे आर्थिक, राजकीय पेच, तिथली वृद्ध होत असलेली लोकसंख्या आदी प्रश्नांचा वाटा आहे.