
As global powers like the US reverse globalization, developing countries like India face major challenges.
जागतिकीकरणाची चक्रे उलटी फिरविण्याचे प्रयत्न जगभर सुरू असलेले दिसतात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हेच त्या प्रक्रियेचे पुढारपणही करीत आहेत की काय, असे चित्र आहे. उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या भारतासारख्या देशांना; किंबहुना एकूणच विकसनशील देशांसाठी ही परिस्थिती आव्हानात्मक आहे. याचे कारण असे, की विविध देशांतून होणाऱ्या आयातीवर जबर शुल्क लादण्याचा सपाटा ट्रम्प यांनी लावला आहे. त्यांचे म्हणणे असे, की इतर देश आमच्या बाबतीत जे करतात, तेच आम्ही इतरांच्या बाबतीत करणार. जशास तसे, हा युक्तिवाद वरकरणी कोणालाही बरोबर आणि तर्कशुद्ध वाटेल. पण तसा तो नाही. जागतिकीकरणाचे सर्व फायदे घेऊन झाल्यानंतर अमेरिकेला हा विचार सोईस्कर सुचला आहे.