

Decline in India's Forex Reserves
esakal
India foreign exchange reserves October 2026: भारताच्या परकीय चलन साठ्यात (Forex Reserves) पुन्हा घसरण झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ३० ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा १.२६९ अब्ज डॉलरने कमी होऊन ७१९.७४८ अब्ज डॉलरवर आला आहे. याआधीच्या अहवालातील आठवड्यातही परकीय चलन साठ्यात ५.०११ अब्ज डॉलरची घट झाली होती. त्यावेळी एकूण साठा ७२१.०१६ अब्ज डॉलरवर पोहोचला होता.