

India tops emerging markets with an 82.2 composite score as FPI flows return to Indian equities
Sakal
गौरव बोरा, शेअर बाजार विश्लेषक
भारतीय शेअर बाजारात अल्पकालीन चढ-उतार सुरू असले, तरी देशाची आर्थिक ताकद सातत्याने वाढत असल्याचे अनेक निर्देशांक स्पष्टपणे दर्शवत आहेत. ‘इमर्जिंग मार्केट ट्रॅकर’मध्ये भारताने सलग अव्वल स्थान कायम ठेवले आहे. त्याचबरोबर चार महिन्यांच्या विक्रीनंतर परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफपीआय) जुलै महिन्यात पुन्हा भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. या दोन्ही घडामोडी भारताच्या दीर्घकालीन विकासकथेची पुष्टी करतात.