Premium|Indian Donation Culture : मंदिरातील दानपेटीपासून यूपीआयपर्यंत; भारतातील देणगी संस्कृतीत मोठा बदल

The Evolution of Donation Culture in India : तंत्रज्ञान, डिजिटल पेमेंट आणि सामाजिक जाणीवेमुळे भारतातील देणगी संस्कृती बदलली आहे. रोख मदतीपासून यूपीआयपर्यंतचा प्रवास अधिक पारदर्शक, सुलभ आणि परिणामकेंद्रित सामाजिक योगदानाची नवी दिशा दाखवतो.
The Evolution of Donation Culture in India

The Evolution of Donation Culture in India

esakal

Updated on

पल्लवी पाटील- pallavi.patil@sevatarang.org

तंत्रज्ञान, वाढती उत्पन्नपातळी आणि सामाजिक प्रश्नांविषयी वाढती जाणीव यांमुळे भारतातील देणगी संस्कृतीत मोठा बदल झाला आहे. गेल्या २० वर्षांत काय बदलले, काय तसेच राहिले आणि आधुनिक भारतीय दात्यासाठी याचा अर्थ काय, याचा वेध घेणारा हा प्रवास... (भाग २)

तंत्रज्ञान, डिजिटल पेमेंट आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे भारतातील देणगी व्यवस्था अधिक सुलभ, पारदर्शक आणि व्यापक झाली आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासाविषयी वाढत्या जागरूकतेमुळे देणगी आता सामाजिक परिवर्तनाचे संघटित, उत्तरदायी आणि परिणामकेंद्रित साधन बनत आहे. मंदिरातील दानपेटीपासून ‘यूपीआय’पर्यंत भारतीय देणगी संस्कृतीचा गेल्या २० वर्षांचा प्रवास रंजक आहे. या प्रवासातील महत्त्वाच्या टप्प्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे. आपण आपल्या मागच्या पिढीतील व्यक्तींना सामाजिक हिताच्या कार्यात त्यांनी कसे योगदान दिले, असे विचारतो, तेव्हा बहुतेकवेळा धार्मिक भावनेतून केलेले दान किंवा ट्रस्ट अथवा संस्थेला केलेली रोख मदत, असे उत्तर मिळते. त्या काळात देणगी देण्याची पद्धत प्रामुख्याने स्थानिक, अनौपचारिक आणि रोख स्वरूपातील होती. फारशी कागदोपत्री नोंद नसे. पारदर्शकता कमी असे आणि पैसे नेमके कुठे वापरले जात आहेत, या प्रश्नाचे उत्तर विश्वासावरच आधारित असे. आज मात्र हे चित्र पूर्णपणे पालटलेले दिसते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com