

Foreign investors pull out over 36,000 crores in September; Nifty hits 6-month low.
Sakal
गौरव बोरा, शेअर बाजार विश्लेषक
भारतीय शेअर बाजाराने एक ऑक्टोबर २०२६ रोजी संपलेल्या आठवड्यात सलग आठव्यांदा साप्ताहिक घसरण नोंदवली. मार्च २०२० मधील कोविड संकटाच्या काळातील सलग सात आठवड्यांच्या घसरणीचा विक्रम मागे टाकत, बाजाराने २००१ नंतरची सर्वाधिक दीर्घ साप्ताहिक घसरण या आठवड्यात अनुभवली. ही घसरण केवळ निर्देशांकांपुरती मर्यादित नसून, परदेशी भांडवलाचा प्रवाह, जागतिक व्याजदर आणि गुंतवणूकदारांच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेतील बदल दर्शवते.