

A representative image showing a person considering an instant digital loan on a smartphone, highlighting the risks of high-cost online borrowing and debt traps.
Sakal
ट्युइश अग्रवाल, आर्थिक संशोधक-विश्लेषक
‘फक्त तीन मिनिटांत २५ हजार रुपये तुमच्या खात्यात!’ मोबाइलवर झळकणारी ही जाहिरात किंवा मेसेज अनेकांना दिलासा देतो. अचानक आलेला वैद्यकीय खर्च, महिनाअखेरीची आर्थिक चणचण किंवा तातडीची गरज... अशा वेळी काही क्लिकमध्ये मिळणारे डिजिटल कर्ज (लोन) वरदान वाटते. मात्र, हेच ‘इन्स्टंट लोन’ अनेकांना कर्जाच्या अशा चक्रव्यूहात अडकवत आहे, जिथून बाहेर पडणे दिवसेंदिवस कठीण होत जाते.