
‘म्युच्युअल फंडांमध्ये होणारी देशांतर्गत गुंतवणूक वाढतच राहणार आहे. अनेक गुंतवणूकदार ‘पॉन्झी’ योजना, लॉटरी, ट्रेडिंग, गेमिंग, क्रिप्टो करन्सी आदींद्वारे श्रीमंत होण्याच्या मृगजळाचा पाठलाग करतात. मात्र, कधी ना कधीतरी त्यांना म्युच्युअल फंडाचे महत्त्व समजेल.
लक्षावधी म्युच्युअल फंड वितरक, कोट्यवधी म्युच्युअल फंड गुंतवणूकदार आणि प्रसारमाध्यमातील अनेक मित्र याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मदत करत आहेत. जसजशी जागरूकता निर्माण जाईल, तसतसा म्युच्युअल फंडांमध्ये पैशाचा ओघ वाढत जाईल,’ सांगत आहेत कोटक म्युच्युअल फंडाचे समूह अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नीलेश शहा. ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार सुहास राजदेरकर यांनी खास ‘सकाळ मनी’साठी घेतलेली त्यांची मुलाखत.