
‘मजबूत देशांतर्गत तरलता आणि सातत्यपूर्ण धोरणात्मक उपायांसह या सुधारणांमुळे भारताला जागतिक भांडवलासाठी एक विश्वासार्ह आणि आकर्षक स्थान मानले जात आहे. वर्धित पारदर्शकता आणि सरळ-सोप्या अनुपालन प्रक्रियेमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास आणखी मजबूत होत आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे,’ असे मत व्यक्त केले आहे ‘ॲम्फी’चे अध्यक्ष आणि एचडीएफसी म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक नवनीत मुनोत यांनी. ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार सुहास राजदेरकर यांनी खास ‘सकाळ मनी’साठी घेतलेली त्यांची मुलाखत.