
डॉ. दिलीप सातभाई, dvsatbhaiandco@gmail.com
देशात गेल्या सात वर्षांत म्युच्युअल फंडातील ‘एसआयपीद्वारे’ होणारे योगदान तीन पटींनी वाढले आहे. शिवाय, ‘एसआयपी’ बुक गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा १६ टक्क्यांनी वाढले आहे. भारतात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास अनेक जण उत्सुक आहेत. परंतु, त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे करदायित्व कसे असेल, याबाबत ते साशंक असतात. त्याच विषयाबद्दल आपण या लेखातून अधिक जाणून घेऊ या.