

भूषण ओक
bhushanoke@hotmail.com
मूल्याधिष्ठित गुंतवणुकीमध्ये मूल्यांकनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मूलतत्वे मजबूत असलेल्या कंपन्या वाजवी मूल्यांकनापेक्षा सवलतीच्या भावात खरेदी करायच्या आणि वाजवी मूल्यांकनापेक्षा चढ्या दरात विकायच्या, हे मूल्याधिष्ठित गुंतवणुकीचे साधे-सोपे आणि सरळ तत्त्व आहे. त्यामुळे शेअर बाजारात सध्या होणाऱ्या घसरणीमुळे बिलकूल निराश न होता ही गुंतवणुकीची एक उत्तम संधी आहे, असे मानायला हवे.