
सुधाकर कुलकर्णी - सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफपी
विमा नियामक प्राधिकरणाने (आयआरडीए) आयुर्विमा (लाईफ इन्शुरन्स) व आरोग्य विमा (हेल्थ इन्शुरन्स) पॉलिसी देणाऱ्या सर्व विमा कंपन्यांना ग्राहकांना ‘ॲस्बा’ सुविधा देणे एक मार्च २०२५ पासून बंधनकारक केले आहे. ग्राहकांना ही सुविधा वापरणे सध्या बंधनकारक नाही, मात्र, कालांतराने ते अनिवार्य होऊ शकेल. ही ‘बीमा-ॲस्बा’ सुविधा नेमकी काय आहे आणि ती कशी वापरता येईल, ते पाहू या.