

AI Boom: A Game Changer for Global Stock Markets?
Sakal
-गौरव बोरा, शेअर बाजाराचे अभ्यासक- विश्लेषक
गेल्या काही वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही फक्त तंत्रज्ञानातील संकल्पना राहिलेली नाही, तर ती जगातील उद्योग व अर्थव्यवस्थेला बदलणारी क्रांती बनली आहे. भारतही या बदलापासून दूर नाही. भारतात डिजिटल परिवर्तन वेगाने होत असल्याने ‘एआय’चा प्रभाव थेट कंपन्यांच्या नफ्यावर व शेअर बाजारावर दिसण्यास सुरुवात झाली आहे. विशेषतः उत्पादकता वाढ, खर्च कमी व कार्यक्षमता सुधारणा या तीन गोष्टींमुळे ‘एआय’ स्वीकारणाऱ्या कंपन्यांना भविष्यात जास्त मूल्यांकन मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘एआय’ पुढील दशकातील आर्थिक वाढीचे प्रमुख इंजिन ठरणार आहे.