
Jane Street’s ₹42,500 Crore Controversy in India’s Stock Market Explained
दीपक घैसास
deepak.ghaisas@gencoval.com
शेअर बाजार व अर्थकारण या विषयात रस घेणाऱ्या भारतातील बहुतेकांना हा प्रश्न पडला असेल, की ‘जेन स्ट्रीट’ व भारतीय भांडवल बाजार नियामक ‘सेबी’ यांच्यात कशामुळे वाद निर्माण झाला, ज्यामुळे तीन जुलैला ‘सेबी’ने या कंपनीला भारतीय शेअर बाजारात व्यवहार करण्यावर तात्पुरती बंदी आणली. ‘सेबी’च्या अंतरीम अहवालानुसार, ‘जेन स्ट्रीट’ने भारताच्या शेअर बाजारात शेअर व ‘बँक निफ्टी’च्या वायदे बाजारात मोठ्या प्रमाणात व्यवहार केले. वस्तुतः हे कोणत्याही बाजारात होणारे व्यवहार आहेत.