
ॲड. प्रतिभा देवी, ज्येष्ठ कर सल्लागार
pratibhasdevi@gmail.com
निवासी किंवा व्यावसायिक कामकाजासाठी जागा भाडेतत्वावर देणे हा अनेकांचा उत्पन्नाचा स्रोत असतो. अनेकजण जागा भाडेतत्वावर देतात, तर काहीजण जागा लीजवर म्हणजेच करारावर देतात. दोन्ही पद्धतीत करार असला, तरीही त्यात फरक आहे.
लीज (Lease) आणि भाडेकरार (Rental Agreement) यातील मुख्य फरक म्हणजे कालावधी आणि वचनबद्धता. लीजमध्ये करार दीर्घ कालावधीसाठी असतो, यामुळे घरमालक आणि भाडेकरू दोघेही या करारासाठी बांधील असतात. भाडेकरार अल्प कालावधीसाठी असतो आणि प्रत्येक महिन्याच्या शेवटी तो बदलता येऊ शकतो.