
डॉ. वीरेंद्र ताटके - गुंतवणूक विषयाचे अभ्यासक
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेत जॉन डेव्हिसन रॉकफेलर नावाचे एक मोठे उद्योगपती होऊन गेले. त्याकाळी अमेरिकेतील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांचा दबदबा होता. अर्थात, केवळ संपत्ती कमावून ते थांबले नाहीत, तर समाजकार्यासाठी एक ट्रस्ट स्थापन करून त्यातून त्यांनी मोठा दानधर्म केला. रॉकफेलर यांनी त्यांच्या मुलाला वेळोवेळी लिहिलेली पत्रे पुढे जगासाठी प्रेरणादायक ठरली. त्या पत्रांमधील निवडक पत्रांचा समावेश असलेले ‘द ३८ लेटर्स फ्रॉम जे डी रॉकफेलर टू हिज सन’ हे पुस्तक खूप गाजले. त्यांच्या मुलाला या पत्रांमधून आयुष्याविषयीदेखील मार्गदर्शन केले होते. सुमारे शंभर वर्षांपूर्वी रॉकफेलर यांनी त्यांच्या मुलासोबत साधलेला पत्रसंवाद आजही तितकाच लागू पडतो. त्यापैकी काही महत्त्वाचे धडे पुढीलप्रमाणे आहेत.