
सुहास राजदेरकर, suhas.rajderkar@gmail.com
मुंबई शेअर बाजाराचा ‘सेन्सेक्स’ हा निर्देशांक सप्टेंबरमधील ८५,९७८ अंशांच्या उच्चांकावरून तब्बल १० टक्के घसरल्यामुळे अनेकांचा धीर सुटला होता. अशावेळी बाजाराला स्थिर होऊन वर जाण्यासाठी काहीतरी ठोस कारण हवे होते, जे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या एकतर्फी लागलेल्या निकालाने मिळवून दिले.
अर्थात, जे अमेरिकेच्या निवडणुकीला जमले नाही, ते महाराष्ट्रातील निवडणुकीनी करून दाखवले. आपल्या राज्याची विधानसभा निवडणूक अर्थव्यवस्थेच्या आणि बाजाराच्या दृष्टीने इतकी महत्त्वाची का होती?, परकी गुंतवणूकदार; तसेच संपूर्ण जगातील उद्योजक, राजकारणी आणि इतर महत्त्वाच्या संस्था या निवडणुकीकडे का लक्ष ठेवून होत्या?