
प्राची गावस्कर
prachi.gawaskar@gmail.com
...दिनकर माळी हे निवृत्त लष्करी जवान होते, त्यांनी १९५८ मध्ये त्यांचे मोठे भाऊ शिवराम यांच्यासोबत कोल्हापुरात शेती अवजारे आणि ट्रॅक्टर ट्रॉलीच्या दुरुस्तीसाठी महादेव आयर्न वर्क्स नावाने एक छोटा कारखाना सुरू केला. त्यानंतर हळूहळू त्यांनी १९६३ मध्ये अग्निशमन बंब आपण बोली भाषेत ज्याला ‘आगीचा बंब’ म्हणतो, ते बनविण्याचा कारखाना सुरू केला. विविध ठिकाणच्या अग्निशमन दलाला या गाड्या पुरवल्या जात. दिनकर माळी यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांनी व्यवसायाचे स्वरुप आणखी बदलले, उत्पादन केंद्र शिरोलीहून गोकुळ शिरगाव एमआयडीसीत नेले आणि नावही बदलले.
अग्निसुरक्षा क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करून भारतीय बनावटीची उपकरणे जागतिक स्तरावर नेण्यात कोल्हापूरमधील फायर फ्लाय पंप्स प्रा. लि. या कंपनीचा मोठा वाटा आहे. साठ वर्षांचा वारसा असलेल्या या कंपनीचा तिसऱ्या पिढीने कायापालट करत या क्षेत्रात ‘आत्मनिर्भर भारत’च्या धर्तीवर ‘भारतनिर्भर जग’ असे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवत वाटचाल सुरू केली आहे. या प्रेरक वाटचालीबाबत कंपनीचे संचालक रोहित माळी यांच्याशी केलेली ही बातचीत...