
प्रसाद घारे
prasad.ghare@gmail.com
ऊठसूट कर्ज घेण्याचा सध्या ट्रेंड आहे आणि बँकांमध्येही कर्ज देण्याची अहमहमिका असते, तसेच मराठी माणूस उद्योगात मागे असल्याची ओरडही केली जाते. या दोन्ही गोष्टींना अपवाद ठरणारी ही प्रेरक यशकथा आहे. पुण्यातील मराठमोळ्या गुप्ते कुटुंबीयांकडून गेली ३५ वर्षे ‘पॉश’ ही इंजिनीअरिंग कंपनी यशस्वीपणे चालवली जात असून, त्यात हजाराहून अधिक मराठी कर्मचारी कार्यरत आहेत. या कंपनीने पाच पैशांचेही कर्ज घेतलेले नाही. ग्राहकांच्या मागणीनुसार दर्जेदार ऑइल कूलर तयार करणारी ‘पॉश’ ही भारतातील एकमेव कंपनी आहे.