
सॉर्भ गुप्ता - इक्विटी हेड, बजाज फिनसर्व्ह एएमसी
सध्या शेअर बाजारात सुरू असलेल्या अनिश्चिततेदरम्यान छोट्या गुंतवणूकदारांना अस्वस्थता जाणवत आहे. प्रमुख निर्देशांकांमधील अस्थिरतेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या तीन महिन्यांत, दोन प्रमुख भू-राजकीय घडामोडींमुळे बाजारपेठेत अस्थिरता वाढलेली दिसून आली आहे. एप्रिलच्या सुरुवातीला अमेरिकेने केलेल्या ‘टेरिफ’च्या घोषणा आणि मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानमधील वाढलेला राजकीय तणाव. या घटनांनी भारतीय बाजारपेठांची परीक्षा घेतली आहे. सात एप्रिल २०२५ रोजी जेव्हा अमेरिकेने ‘रेसिप्रोकल टेरिफ’ जाहीर केले, त्या दिवशी इंडिया VIX निर्देशांक २२.७९०० वर पोहोचला, जी जवळजवळ एका वर्षातील सर्वोच्च पातळी आहे.