
डॉ. दिलीप सातभाई - चार्टर्ड अकाउंटंट- सीए
प्राप्तिकर कायद्याच्या कलम ७२ए आणि ७२एएमध्ये कंपन्यांच्या एकत्रीकरणानंतर (Amalgamation) संचित तोटा पुढे ओढणे, समायोजित करणे आणि व्यवसाय पुनर्रचनेत अवशोषित घसारा देण्याशी संबंधित तरतुदी नमूद केल्या आहेत. पूर्वी, जेव्हा एखाद्या तोट्यात असलेल्या कंपनीचे नफ्यात असलेल्या कंपनीबरोबर एकत्रीकरण होत होते किंवा व्यवसाय पुनर्रचना होऊन नवी कंपनी तयार होऊन मालकी हक्कात मोठा बदल होत असे, तेव्हा नवी भागधारक कंपनी अशा संपादनाच्या वेळेपासून पुढील आठ वर्षांपर्यंत जुन्या कंपनीतील तोटा पुढे ओढू शकत असे किंवा त्यांच्या झालेल्या नफ्यातून समायोजित करू शकत असे. त्यामुळे त्यांना प्राप्तिकर दायित्वाची रक्कम कमी करण्यासाठी मदत होत असे. त्याचप्रमाणे भविष्यातील नफ्याविरुद्ध हा तोटा भरून काढता येऊ शकत होता.