
अनिकेत कोनकर, aniketbkonkar@gmail.com
मायक्रो फायनान्स अर्थात सूक्ष्म वित्तपुरवठा हा विषय गेल्या काही महिन्यांमध्ये एकदमच चर्चेत आला आहे. खासकरून रत्नागिरी जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून ठिकठिकाणी मायक्रो फायनान्स कंपन्यांविरुद्ध झालेल्या सभा आणि एल्गार मेळावे यांमुळे वातावरण तापलेलं आहे. मायक्रो फायनान्स या विषयाने या भागात आता समस्येचं रूप धारण केलं असलं, तरी त्याची इथली सुरुवात मात्र सुमारे आठ-१० वर्षांपूर्वी झाली आहे.
बचत गटांच्या चळवळीने बहुतांश ठिकाणी आदर्शवत कामगिरी केली आहे. असं असताना रत्नागिरीत मायक्रो फायनान्स हा विषय समस्या का ठरावा, त्यात नेमकी समस्या काय आहे आणि त्या समस्येवर उपाय काय असू शकतात, याचा थोडक्यात ऊहापोह करण्याचा हा प्रयत्न आहे.