Mid Cap Stocks: मिड-कॅप, स्मॉल-कॅपमध्ये भूकंप!

Market Turmoil Hits Mid Cap and Small Cap Stocks in India: मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्समध्ये मोठी घसरण; गुंतवणूकदारांसाठी धोक्याची घंटा?
Indian Stock Market News Mid Cap Small Cap Stocks See Heavy Selling Amid Market Volatility and Rising Investor Concerns

Indian Stock Market News Mid Cap Small Cap Stocks See Heavy Selling Amid Market Volatility and Rising Investor Concerns

sakal

Updated on: 

-गौरव बोरा, शेअर बाजार विश्‍लेषक

भारतीय शेअर बाजारात २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मिड कॅप व स्मॉल कॅप शेअरमध्ये मोठी विक्री झाली. आठवडाभरात ‘निफ्टी मिड कॅप १००’ निर्देशांक सुमारे ५.६ टक्के आणि ‘निफ्टी स्मॉल कॅप १००’ निर्देशांक सुमारे ७.३ टक्क्यांनी घसरला. याउलट ‘निफ्टी ५०’मध्ये सुमारे २.४ टक्क्यांनी घसरण झाली. बाजारातील दबावामुळे ‘निफ्टी मिड कॅप १००’ आणि ‘निफ्टी स्मॉल कॅप १००’ त्यांच्या अलीकडील उच्चांकापासून अनुक्रमे सुमारे १३.५ टक्के व १२ टक्क्‍यांनी खाली आले आहेत. म्हणजेच, मोठ्या कंपन्यांच्या तुलनेत छोट्या कंपन्यांच्या शेअरना जवळपास तिप्पट फटका बसला. बाजारातील ही घसरण केवळ आकड्यांपुरती मर्यादित नसून, गुंतवणूकदारांच्या मानसिकतेचीही परीक्षा घेत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com