Income Tax : ‘रिफंड’ मिळण्यास विलंब कशामुळे?

income tax refund delay 2026 : करदात्यांचे प्राप्तिकर परतावे ९० दिवसांहून अधिक काळ रखडले आहेत. २४ लाख ६४ हजार करदात्यांचे परतावे प्रलंबित आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून ‘नज’ मोहिमेचा कार्यान्वयन सुरू असून, करदात्यांनी आपले विवरणपत्र आणि बँक खाते वैध करण्याची सूचना दिली आहे.
income tax refund delay 2026

income tax refund delay 2026

sakal

Updated on

ॲड. सुनील टाकळकर- ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ व गुंतवणूक सल्लागार

प्रामाणिकपणे कर भरणारा सर्वसामान्य माणूस वर्षभराच्या हिशोबानंतर आपल्या हक्काच्या परताव्याची (रिफंड) चातकासारखी वाट पाहात असतो. मात्र, यंदा ही प्रतीक्षा लांबली असून, लाखो करदात्यांचे पैसे अडकून पडले आहेत. केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार फेब्रुवारी २०२६ पर्यंत तब्बल २४ लाख ६४ हजार करदात्यांचे प्राप्तिकर परतावे ९० दिवसांहून अधिक काळापासून प्रलंबित आहेत. केंद्रीय प्रक्रिया केंद्राला (सीपीसी) आर्थिक वर्षाच्या शेवटापासून नऊ महिने (३१ डिसेंबर २०२६ पर्यंत) प्रक्रिया करण्याची मुदत आहे. तरी अशाप्रकारे डिजिटल युगातही हजारो कोटी रुपये सरकारी प्रक्रियेत अडकून पडल्याने करदात्यांमध्ये अस्वस्थता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com