

Legal implications of property ownership and inheritance rights in India
Sakal
गौरी रास्ते, निवृत्त बँक अधिकारी
नव्या घराच्या वास्तूशांतीचे आमंत्रण देण्यासाठी खास सुट्टी काढून वैभव परदेशातून आला होता. त्याने तेव्हा अगदी अभिमानाने सांगितले, की ‘नवे घर बाबा आणि माझी धाकटी बहीण तन्वी यांच्या नावे घेतले आहे; कारण घर नोंदणीच्या प्रक्रियेसाठी तेव्हा मला सुट्टी घेऊन येणे शक्य नव्हते. सगळेच तर आपले आहेत, पैसे मी पाठवले असले, तरी नावे त्यांची लावली आहेत. दारावर मात्र, माझीच पाटी लावली आहे.’