

Cyber Safety Guide: Protect Your Smartphone from Online Fraud
sakal
- शिरीष देशपांडे चार्टर्ड अकाउंटंट, सायबर गुन्हे विश्लेषक
सायबर चोरट्यांसाठी कोणत्याही सायबर गुन्ह्यात तुमचा मोबाईल हा महत्त्वाचा दुवा असतो. सायबर चोरटे तुमच्याशी फोनवर बोलून, तुमचा मोबाईल ‘क्लोन’ करणे, तुमचे बिल भरले नाही सांगणे, तुम्हाला ‘डिजिटल ॲरेस्ट’ झाली आहे असे सांगणे, तुमच्या नावाने गुन्हा घडला असल्याचे सांगणे, तुम्हाला घाबरवणे, मदतीचे खोटे आमिष दाखवणे, धमकी देणे, सिम बदलायचे आहे आदी सर्व मोबाईलच्या पहिल्या संपर्कात घडू शकते. तुमचा मोबाईल हा स्मार्ट फोन असेल तर त्याद्वारे आपण सोशल मीडियावर जोडले जातो. आपल्या मोबाईल नंबरच्या आधारे आपले व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी अकाउंट वापरता येतात.