
भूषण ओक- शेअर बाजार विश्लेषक
मोल्ड-टेक पॅकेजिंग लि. ही कंपनी वंगण तेल, रंग, खाण्याचे पदार्थ, औषधे आणि रोजच्या वापरातील ते अगदी आइस्क्रीमपासून रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या डब्यांचे उत्पादन करते. कंपनीच्या ग्राहकांमध्ये कन्साय नेरोलॅक, एशियन पेंट्स, हिमालया, क्वालिटी वॉल्स, डाबर, अमूल, नेसकॅफे आणि हलदीराम यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. कंपनी उत्पादनप्रक्रियेसाठी इंजेक्शन मोल्डिंग तंत्रज्ञान वापरते. या डब्यांची लेबलेदेखील याच तंत्रज्ञानाने डबे तयार करतानाच छापून येतात.