

Investment as a Gift: How Prepaid Instruments are Changing Wealth Creation in India
Sakal
ॲड. सुनील टाकळकर, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ व विमा सल्लागार
भारतीय परंपरेत सण-उत्सव, वाढदिवस, लग्न, मुंज अशा समारंभांत आहेर किंवा भेट देण्याची पद्धत आहे. बदलत्या डिजिटल युगात केवळ वस्तू किंवा रोख रक्कम देण्यापेक्षा ‘म्युच्युअल फंड गिफ्ट कार्ड’च्या रूपाने ‘संपत्तीनिर्मिती’ करणारी अभिनव भेट देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. भांडवल बाजार नियमक ‘सेबी’ आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही संकल्पना प्रत्यक्षात आली आहे.