

From Veterinary Doctor to Millionaire: Dr. Ghangale’s Inspiring Mutual Fund Journey
E sakal
Mutual Fund Discipline: A Marathi Family’s Story of Wealth, Wisdom, and Patience
सुधीर भगत
sudhir@mahantfinserv.com
शेअर बाजारात म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून अभ्यासपूर्वक, दीर्घकाळ गुंतवणूक करणे हा संपत्तीनिर्मितीचा एक उत्तम मार्ग आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्या मार्गावर सातत्यपूर्ण वाटचाल करत राहिले, तर अविश्वसनीय वाटणारी उद्दिष्टेदेखील साध्य होऊ शकतात. याचे उत्तम उदाहरण असलेली ही एक कथा…
माझ्या आयुष्यातील २१ जानेवारी २०१९ हा दिवस मी कधीच विसरू शकत नाही. मी कल्पनाही केली नव्हती, की मी अशा व्यक्तीला भेटेन, जी माझ्यासाठी आणि माझ्या गुंतवणूकदारांसाठी आयुष्यभर प्रेरणादायी ठरेल. अशी व्यक्ती जी माझ्या जीवनाच्या दृष्टिकोनात आणि व्यवसाय विकासात खूप मोठा फरक आणेल. त्यादरम्यान माझे आर्थिक साक्षरतेवरचे काम नवीनच सुरू झाले होते. माझी छोटीशी म्युच्युअल फंड वितरण कंपनीसुद्धा त्याच वेळेस सुरू झाली होती. २१ जानेवारी या दिवशी राज्य सरकारच्या राजगुरुनगमधील पशुसंवर्धन विभागाच्या कार्यालयात मी सकाळी ११ वाजता पोहोचलो.