
प्रमोद पुराणिक, pramodpuranik5@gmail.com
राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) सुरू होताना १००० हा पाया पकडून निर्देशांकाची (निफ्टी) आकडेवारी प्रसिद्ध करण्यास सुरुवात झाली. ‘निफ्टी ५०’ या निर्देशांकात मुंबई शेअर बाजाराचा ३० शेअरचा संवेदनशील निर्देशांक पूर्णपणे समाविष्ट आहे, त्यामुळे उरलेले २० शेअर विचारात घेतले, की ‘निफ्टी ५०’ तयार होतो आणि म्हणूनच ‘नेक्स्ट ५०’ या निर्देशांकात पूर्ण वेगळे शेअर आहेत. या निफ्टी नेक्स्ट फिफ्टी निर्देशांकाची लोकप्रियता वाढत आहे. त्याबाबत सविस्तर माहिती घेणे गुंतवणूकदारांच्या दृष्टीने उपयुक्त आहे.