

RIS allows NPS subscribers to receive systematic payouts while keeping mandatory annuity requirements intact.
Sakal
दीपाली किणीकर, चार्टर्ड अकाउंटंट-सीए
राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये (एनपीएस) गेल्या काही दिवसांत अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी पैसे गुंतवण्याचे आणि योजनेतून बाहेर पडण्याचे नियम बदलल्यानंतर, आता सरकारने पैसे काढण्याच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यावर भर दिला आहे. निवृत्तीनंतरच्या सुरक्षित आणि सुटसुटीत आर्थिक नियोजनासाठी आता ‘रिटायरमेंट इन्कम स्कीम’ म्हणजेच ‘आरआयएस’ हा एक नवा पर्याय म्हणून पुढे येत आहे.