
नंदिनी वैद्य - ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार
नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लि. (NATIONAL SECURITIES DEPOSITORY LTD.) अर्थात ‘एनएसडीएल’चा बहुचर्चित आयपीओ ३० जुलै ते एक ऑगस्टदरम्यान येत आहे. किंमतपट्टा ७६०-८०० रुपये असा निश्चित करण्यात आला आहे. १९९६ मध्ये सुरू झालेली ही कंपनी ‘सेबी’कडे मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टिट्यूशन म्हणून नोंदणीकृत आहे. अगदी सोप्या भाषेत सांगावयाचे झाले तर यांच्या व्यवसायाचे स्वरूप म्हणजे जसे आपण आपले दागिने बँक लॉकरमध्ये ठेवतो अगदी तसे आपले सर्व शेअर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात डिजिटल लॉकरमध्ये (म्हणजे आपले डी-मॅट अकाउंट) जेथे जतन केले जातात, ती संस्था म्हणजे ‘एनएसडीएल’. शेअर बाजाराच्या दृष्टीने डिपॉझिटरी म्हणजे गाडीचे इंजिन! यातच कंपनीचा व्यवसाय किती लाखमोलाचा आहे, याची कल्पना यावी.