Old Monk बंदच! महाराष्ट्रात विक्री पुन्हा कधी सुरू होणार? कंपनीने हायकोर्टातील याचिका घेतली मागे

Why Is Old Monk Banned in Maharashtra? : महाराष्ट्रात ओल्ड मॉन्कची विक्री का बंद झाली? रमच्या लेबलिंगवरून एफएसएसएआय आणि कंपनीमध्ये वाद निर्माण झाला असून कंपनीने हायकोर्टातील याचिका मागे घेतली आहे.
Old Monk rum sales remain suspended in Maharashtra following FSSAI's objections over product labelling and its classification as rum

Old Monk rum sales remain suspended in Maharashtra following FSSAI's objections over product labelling and its classification as rum

esakal

Updated on: 

भारतातील लोकप्रिय मद्य ब्रँडपैकी एक असलेल्या ओल्ड मॉन्कच्या विक्रीवर महाराष्ट्रात मे-जून महिन्यापासून निर्बंध आहेत. या कारवाईमागे उत्पादनाच्या गुणवत्तेचा नव्हे, तर त्याला ‘रम’ म्हणून विकता येईल का, या प्रश्नाचा पेच निर्माण झाला आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) या उत्पादनाच्या विक्रीवर बंदी घातली होती. आता या प्रकरणात नवा बदल झाला असून, ओल्ड मॉन्कची निर्मिती करणाऱ्या कंपनीने मुंबई उच्च न्यायालयातील याचिका मागे घेतली आहे. सुधारित लेबलसह पुन्हा नियामक प्राधिकरणाकडे जाण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

Loading content, please wait...