
गेल्या काही काळापासून सेंद्रिय भाजीपाला, अन्नधान्य, दूध आणि अन्य पदार्थ वापरण्याबाबत जागरूकता वाढत असली, तरीही आपल्या देशातील लोकसंख्येच्या मानाने हे प्रमाण अत्यल्प आहे. सेंद्रिय शेतीचे अल्प प्रमाण, अल्प उत्पादन आणि सहज उपलब्धतेतील अडचणींबरोबरच लोकांमध्ये त्याबाबत असलेली अनास्था यामुळे सेंद्रिय शेती आणि त्यातील उत्पादने लोकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्योग करणे आव्हानात्मक आहे. तरीही सेंद्रिय वस्तूंच्या वापराला आणि शेतीलाही प्रोत्साहन देण्यासाठी ई-कॉमर्सच्या माध्यमातून मुक्ता पंडित यांनी ‘बायो बास्केट’ हा ब्रँड नावारुपाला आणला आहे.
‘सकाळ मनी’साठी प्राची गावस्कर यांनी घेतलेली त्यांची खास मुलाखत...