
नवी दिल्ली : देशातील जवळपास ८३ टक्के इंजिनिअर आणि बिझनेस स्कूलमधील ४६ टक्के पदवीधर बेरोजगार असल्याचे धक्कादायक चित्र एका अहवालातून समोर आले आहे. 'अनस्टॉप टॅलेंट रिपोर्ट २०२५'मध्ये यासंदर्भातील निरीक्षण मांडण्यात आले आहे.
इंजिनिअरिंग महाविद्यालयातून पदवी घेतलेल्या ८३ टक्के विद्यार्थ्यांना नोकरीची किंवा इंटर्नशिपची संधीही मिळालेली नाही. या अहवालानुसार GenZ मधील ५१ टक्के पदवीधरांना एका सुरक्षित नोकरीऐवजी उत्पन्नाचे विविध स्रोत असणे जास्त महत्त्वाचे वाटते.