

He Left a ₹13 Lakh Job for AI Masters in the US and Landed a ₹1.5 Crore AWS Package
esakal
Aditya Arepalli: चांगली नोकरी, तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभव आणि सुमारे १३ लाख रुपयांचे वार्षिक वेतन असतानाही आदित्य अरेपल्ली यांनी करिअरचा वेगळा मार्ग निवडला. बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) क्षेत्रात विशेष कौशल्य मिळवण्याच्या उद्देशाने त्यांनी नोकरी सोडून अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना अमेरिकेत ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसकडून (AWS) अंदाजे १.५ कोटी रुपयांच्या पॅकेजची नोकरीची ऑफर मिळाल्याचे सोशल मीडियावरील पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.