Amazon Investment: भारतीयांना दरवर्षी मिळणार दीड लाख नोकऱ्या! अ‍ॅमेझॉन करणार मोठी गुंतवणूक

amazon
amazon esakal

Amazon Investment : अ‍ॅमेझॉनने नुकतेच ५०० कर्मचाऱ्यांना नारळ दिले आहे. मात्र आता समाधानकारक बातमी समोर आली आहे. अ‍ॅमेझॉनने मोठी घोषणा केली आहे. अ‍ॅमेझॉन भारतातील मोठी गुंतवणूक करणार आहे. यामुळे दरवर्षी १.३२ लाख नोकऱ्या निर्माण होतील.

Amazon Web Services (AWS) २०३० पर्यंत भारतात क्लाउड संबंधित पायाभूत सुविधांमध्ये १,०५,६०० कोटी (१२.७ अब्ज डॉलर) गुंतवणूक करणार आहे. क्लाउड सेवांसाठी ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनी ही गुंतवणूक करत आहे. Amazon.com Inc च्या क्लाउड कंप्युटिंग विभागाने ही माहिती दिली.  या गुंतवणुकीमुळे देशात दरवर्षी अंदाजे सरासरी १३१,७०० नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

AWS ने २०१६ आणि २०२२ दरम्यान भारतात ३ अब्ज पेक्षा जास्त गुंतवणूक केली, ज्यामुळे भारतीय व्यवसायांमध्ये वार्षिक ३९,५०० नोकऱ्या निर्माण होण्यास मदत झाली.

AWS चे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), अ‍ॅडम सेलिपस्की म्हणाले, "AWS एक डिजिटल पॉवरहाऊस म्हणून भारताच्या वाढीसाठी दीर्घकाळापासून काम करत आहे. २०१६ पासून आमच्या पायाभूत सुविधांमुळे मोठी प्रगती झाली आहे."

amazon
Kiren Rijiju: ...अन् रिजीजूंची झाली उचलबांगडी! जाणून घ्या का काढून घेतलं कायदा मंत्रीपद

इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार,  जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारत एक "उज्ज्वल स्थान" राहिले आहे, जेथे व्यवसाय मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहेत.

मला माहित आहे की सरकार २०२५ पर्यंत ट्रिलियन-डॉलरची डिजिटल अर्थव्यवस्था तयार करण्याचा प्रयत्न करत आहे, पुढील काही वर्षांत भारत ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या मार्गावर आहे. ह्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारतासाठी क्लाउड तंत्रज्ञान स्वीकारणे महत्त्वाचे आहे, असे अ‍ॅडम सेलिपस्की यांनी स्पष्ट केले. 

amazon
CJI Chandrachud : केरला स्टोरीवर बंदीसाठी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका! स्वत: CJI चंद्रचूड पाहणार चित्रपट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com