
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने भारतावर 50% टॅरिफ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामागील कारण म्हणजे भारताचा रशियाकडून तेल खरेदीचा व्यवहार, ज्यामुळे रशिया-युक्रेन युद्धाला प्रोत्साहन मिळत असल्याचा अमेरिकेचा दावा आहे. ट्रम्प यांच्या व्यापार सल्लागार पीटर नावारो यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "रशिया-युक्रेन युद्धात शांततेचा मार्ग भारतातून जातो," आणि भारताच्या तेल खरेदीमुळे युद्धाला खत मिळत आहे.