AU Small Finance Bank : एयू बँकेच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण, तुमच्याकडे शेअर्स असतील तर काय कराल ?

एयू स्मॉल फायनान्स बँकेचे (AU Small Finance Bank) शेअर्स काही काळापासून घसरत आहेत. गेल्या एक वर्षापासून या समभागाने आपल्या गुंतवणूकदारांना नेगिटीव्ह रिटर्न दिला आहे.
AU Small Finance Bank
AU Small Finance BankSakal

एयू स्मॉल फायनान्स बँकेचे (AU Small Finance Bank) शेअर्स काही काळापासून घसरत आहेत. गेल्या एक वर्षापासून या समभागाने आपल्या गुंतवणूकदारांना नेगिटीव्ह रिटर्न दिला आहे. पण यापुढे बँकेचा व्यवसाय वाढवून व्यवसाय दुप्पट करण्याचे उद्दिष्ट असल्याचे वक्तव्य बँकेच्या एमडींनी केले आहे.

पुढील तीन वर्षांत 25 टक्के वाढीचे लक्ष्य ठेवत आहोत आणि आमचे दशक पूर्ण होईपर्यंत बॅलेन्सशीटचा आकार दुप्पट करून 2.5 लाख कोटी करू असे एयू स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक संजय अग्रवाल यांनी सांगितले.

एयू स्मॉल फायनान्स बँकेने तीन वर्षांत आपल्या बॅलेन्सशीटचा आकार दुप्पट करून 2.5 लाख कोटी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. फिनकेअर एसएफबीचे अधिग्रहण आणि देशातील वाढत्या वापराचा कल यामुळे बँकेला यामध्ये मदत होणार आहे. बँकेने या आठवड्यात ‘एयू रेमिट’ सह विदेशी चलन व्यापारात अधिकृत डीलर (AD-I) परवाने आणि एयू डिजीट्रेडसह क्रॉस-बॉर्डर व्यापार सुरू केला.

एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या व्यवसायात वाढ दिसून येत आहे. बँकेचा व्यवसाय 2017 मध्ये 10,000 कोटीच्या भांडवलाने सुरू झाला. आता बँकेचे भांडवल 1.25 लाख कोटी झाले आहे. बँकेतील कर्मचाऱ्यांची संख्या तेव्हा 3,000 वरून आता 46,000 झाली आहे. शिवाय बँकेच्या शाखा 300 वरून आता 2,400 झाल्या आहेत.

26 एप्रिल 2024 रोजी एनएसईवर शेअरची किंमत 600 रुपयांवर होती. या काळात शेअरमध्ये 7.95 रुपयांची (1.31%) घसरण दिसून आली. यासोबतच गेल्या एका महिन्यात या शेअरने सुमारे 2 टक्के पॉझिटीव्ह रिटर्न दिला आहे.

पण, 6 महिन्यांत स्टॉकमध्ये सुमारे 10% घट झाली आहे. एका वर्षात स्टॉकमध्ये 12 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. अशात या वर्षी जानेवारीपासून स्टॉकमध्ये 23% पेक्षा जास्त घसरण झाली आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 813.40 रुपये आहे आणि त्याची 52 आठवड्यांचा नीचांक 553.70 रुपये आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com